ताम्हिणी घाटात ट्रकचा ब्रेक फेल होऊन अपघात

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी ।
माणगांव पोलीस ठाणे हद्दीत मौजे कोंडेथर गावचे हद्दीत ताम्हिणी घाटात पुणे माणगांव रोडवर आज रोजी सकाळी ६:३० ते ७ च्या सुमारास ट्रक क्रमांक MH 12 LT 4599 हि पुणे वरून माणगांव कडे येत असताना गाडीचा ब्रेक फेल होऊन झाडाला ठोकर लागुन अपघात झाला आहे. यामध्ये तीन पुरुष ट्रकच्या केबिनमध्ये अडकलेले होते. सदर ईसमाना रेस्क्यू टीम व स्टाफच्या मदतीने सुखरूप बाहेर काढन्यात आले. जखमींवर माणगांव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Exit mobile version