कार्ले खिंडीत ट्रकची टेम्पोला धडक; चालक जखमी

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

भरधाव सिलिंडर ट्रकने आयशर टेम्पोला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात ट्रक चालक जखमी झाला आहे.

अलिबाग पेण मार्गावरील कार्ले खिंडीत हा अपघात झाला. दुपारी 3.20 च्या सुमारास अलिबागकडे जात असलेल्या आयशर टेम्पोला मागून येणाऱ्या रिकामे सिलिंडर असलेला ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने टेम्पोला मागून धडक दिली. या अपघातामुळे दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. तर, अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती.

Exit mobile version