शिव शिल्पाच्या बांधकामाला ट्रकची धडक

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यात प्रवेश करणाऱ्या रस्त्यांवर कर्जत-चारफाटा येथे शिव शिल्प स्वागत कमान उभारली जात आहे. या स्वागत कमानीला एका ट्रकने धडक दिली असून, या बांधकाम सुरू असलेल्या कमानीचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान त्या ट्रक चालकावर कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ट्रॅक चालकाला अटक करण्यात आली आहे.

कर्जत-चारफाटा येथून कर्जत शहर पुढे मुरबाड राष्ट्रीय महामार्ग, कर्जत स्टेशन आणि नेरळ-माथेरान-कल्याण असे रस्ते जातात. त्यामुळे या महत्वाच्या चौकात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून शिव शिल्प कमान उभारली जात आहे. या स्वागत कमानीचे आरसीसी काम सुरू असून, शुक्रवारी (दि.27) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास लोखंडी साहित्य घेऊन आलेल्या ट्रकने धडक दिली. त्या धडकेत स्वागत कमानीचा एक आरसीसी भाग कोसळला असून, त्यामुळे कमानीच्या मूळ ढाच्याचे नुकसान झाले आहे. ही धडक बसल्यावर मोठ्या प्रमाणावर कमानीचे नुकसान करणाऱ्या ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणावर लोखंडी साहित्य होते. त्या ट्रक चालकावर कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात या संबंधित ट्रकच्या मालकाला बोलविण्यात आले होते.

Exit mobile version