मुंबई-पुणे महामार्गावर ट्रक पलटी; चालक जखमी

। खोपोली । प्रतिनिधी ।

मुंबई-पुणे महामार्गावरील खोपोली एक्सिट जवळच्या वळणावर ट्रकने कठड्याला जोरदार धडक देत अपघात घडल्याची घटना घडली आहे. या अपघातात ट्रक चालकजखमी झाला असून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुंबई-पुणे महामार्गावरून ट्रक(जीजे-24-व्ही-4089) पुण्यावरून मुंबईकडे माल घेऊन जातं असताना तो बोरघाटात खोपोली एक्सिटजवळच्या अवघड वळणावर येताच चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटताच ट्रकने समोरील कठड्याला जोरदार धडक देत रस्त्याच्या बाजूला पलटी झाला. या अपघातात ट्रक चालक महंमद शरीफ शेख (40) रा. गुजरात किरकोळ जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे,

Exit mobile version