भीषण अपघात! ट्रकचा ब्रेक फेल;चालक जागीच ठार

| खोपोली | प्रतिनिधी |
मुबंई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघाताची मालिका सतत सुरू असून शनिवारी (दि.9) पहाटे बोरघाटात एका ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने त्याने समोरील ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. यामध्ये ट्रकमधील सहचालकाचा जागीच मृत्यू झाला.

मुबंई-पुणे एक्सप्रेस वेवरून साखरेच्या गोणी घेऊन चालक राकेश कुमार (वय 35, रा. बिहार) हा ट्रक चालक पुण्यावरून मुबंईकडे जात होता. बोरघाटात ढेकू गावाजवळ आला असता तीव्र उतारावर त्याचा ब्रेक फेल झाल्याने त्याने समोरील ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, ट्रकची केबिन पूर्णपणे दबून सहचालक सुरेश यादव (वय 35, रा. उत्तरप्रदेश) याचा जागीच मृत्यू झाला.

या अपघाताची महिती मिळताच बोरघाट पोलीस, देवदूत यंत्रणा, अपघातग्रस्त टीमचे सदस्य, आयआरबी टीम हे तात्काळ घटनास्थळी दाखल होत क्रेनच्या साहाय्याने केबिनमध्ये अडकलेल्या चालकास बाहेर काढले. तसेच एक्सप्रेसवे वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात आला, तर दुसऱ्या ट्रकमधील चालक अपघाताची माहिती न देता पळून गेला

Exit mobile version