क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत पुरस्कार

। खरोशी । प्रतिनिधी ।

पेण तालुक्यातील सात ग्रामपंचायतींना क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी पेण तालुक्यातील कोपर, निधवली, बोर्झे, कोप्रोली, सावरसई, आमटेम, कासू या ग्रामपंचायतींना क्षयरोगमुक्त ग्रामपंचायत पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच, या सर्वांना मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधीची प्रतिकृती व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

पेण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी लता मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अपर्णा पवार, सहाय्यक गटविकास अधिकारी सविता कांबळे, विस्तार अधिकारी समीर सानप, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र कामार्ली, जिते यांच्यासह सातही ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच ग्रामसेवक, आरोग्य सेवक समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, आशाताई आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Exit mobile version