चोवीस लाखांला गंडा

| चिरनेर | वार्ताहर |
न्हावा शेवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका नवीन योजनेचा आधार घेत, एका व्यक्तीला 24 लाख रुपयांना गंडविले. रविकिरण दिनकर सांगडे असे या व्यक्तीचे नाव असून, तो उलवा येथे राहायला आहे. रविकिरणचे मोबाईलवर टेलिग्राम खाते असून, त्याला ऑनलाइन पार्ट टाइम जॉब याबाबत विचारणा करण्यात आली होती. त्यानंतर त्याला काही साइटवर लॉग इन करायला सांगून, कामाचे स्वरूप सांगितले. त्या कामाचा मोबदला म्हणून रवीकिरण याला 841 रुपये त्यांच्या बँक खात्यावर पाठविण्यात आले. कमी वेळेत सोपे काम करून अधिक पैसे मिळत असल्याचे पाहून त्यांनी यादरम्यान तब्बल 24 लाख 8 हजार 729 रुपये या अज्ञात व्यक्तींना पाठविले. त्यानंतर त्याला मोबदला देण्याचे बंद झाल्यावर, त्याला आपली फसवणूक झाल्याचे समजले असता त्याने न्हावा शेवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Exit mobile version