| रत्नागिरी | प्रतिनिधी |
खेड शहरातील सहजीवन हायस्कूल समोरील झमझम हाऊसिंग सोसायटीमध्ये वास्तव्य करणारे 80 वर्षीय बबन हरी खेडेकर हे शनिवारी (दि.3) दुपारी 12 वाजता काही कामानिमित्त घरातून बाहेर पडले होते. मात्र, उशिरापर्यंत ते घरी न परतल्याने कुटुंबियांनी त्यांचा शोध सुरू केला होता. दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळच्या सुमारास (दि.4) ब्राह्मणआळी लगत असलेल्या खेडजाई देवीचा होम लागण्याच्या ठिकाणी ते चिखलात पडलेले आढळून आले. ते तब्बल वीस तास पावसाच्या चिखलात अडकून पडले होते. ही बाब माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर व सोनारआळी मित्र मंडळाचे सदस्यांना कळल्यावर त्यांनी त्यांना चिखलातून बाहेर काढले. यानंतर बबन यांच्यावर औषधोपचार करण्यासाठी नातेवाईक यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.