खोपोलीतील घरफोडीप्रकरणी दोघे अटकेत

| खोपोली | प्रतिनिधी |
लौजी, चिंचवली येथील पाच ठिकाणी घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना खोपोली पोलिसांनी अटक करुन मोठ्या प्रमाणात मुद्देमाल हस्तगत केला.
लौजी, चिंचवली या परिसरात गेल्या आठवड्यात अज्ञात चोरटयांनी श्रीरामनगर व म्हामूणकर चैकातील बंद असलेल्या पाच वेगवेगळया दुकानांना लक्ष्य करून या दुकानांचे शटर्स उपकून दुकानातील वेगवेगळया प्रकारच्या सुमारे 30,400/- रूपये किंमतीच्या मुद्देमालाची चोरी केली होती.

खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे खोपोली पोलिसांनी तपास करुन बदलापूर येथून अमनकुमार जंगली यादव, अजिज मेहबुब शेख यांना ताब्यात घेवून त्याच्याकडे अधिक सखोल चैकशी केली असता त्याने त्याच्या आणखी एक साथीदारासह वरील नमूद परिसरातील दुकानांची शटर्स उपकून घरफोडया केल्याची कबूली दिली आणि त्याचा एक साथीदार हा पळून गेला असल्याचे त्याने सांगितले. तसेच त्याने त्याचे नांव राहुल चैौहान असे असल्याचे सांगितले.

Exit mobile version