महाडजवळ दोन कारचा अपघात; १ ठार ४ जखमी

। महाड । प्रतिनिधी ।
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड तालुक्यातील टोळगाव उड्डाणपुलावर गुरुवारी (दि.11) दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास दोन कारची समोरासमोर धडक बसल्याने अपघात झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर चार प्रवासी गंभीर जखमी झाले.

माणगाव ते महाड जाणारी स्विफ्ट कार क्रमांक एम एच 06 बी एम 5721 आणि समोरुन येणार होंडा सिटी कार क्रमांक एमएच 43 एक्स 2537 या दोन कारमध्ये समोरासमोर जोराची धडक झाली. या अपघातात होंडा कारचालक अनिकेत अशोक महाडीक (25) रा.वडघर, गोरेगाव, जि. रायगड याचा जागीच मृत्यू झाला. तसेच प्रतीक अशोक महाडीक (22) वडघर गोरेगाव, सुहास कृष्णाजी दांडेकर (67), सुरेखा सुहास दांडेकर (65), अनिकेत सुहास दांडेकर सर्व राहणार उतेखोल माणगाव, हे जखमी झाले. त्यांच्यावर महाड ग्रामीण रुग्णालयात औषधोपचार सुरु आहे.

Exit mobile version