राज्यस्तरीय पिंच्याक सिल्याट स्पर्धेत अनुज सरनाईकला दोन सुवर्ण पदके

| सुधागड -पाली । वार्ताहर ।
12 वी राज्यस्तरीय पिंच्याक सिल्याट स्पर्धा 22 ते 24 सप्टेंबर रोजी विभागीय क्रिडा संकुल, हिरावाडी, पंचवटी, नाशिक येथे संपन्न झाली. या स्पर्धेत 85 ते 90 वजनी गटात फाईटमध्ये पालीतील अनुज सरनाईकने सुवर्ण पदक पटकावले आहे. तसेच ग्रुप इव्हेंटमध्ये सुद्धा सुवर्ण पदक मिळविले आहे. यामुळे रायगड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

ग्रुप इव्हेंट रेगूमध्ये अनुज सरनाईक, अंशुल कांबळे, वैभव काळे यांनी सांघिक सुवर्ण पदके पटकावले आहे. या स्पर्धेत एकूण 36 जिल्हे आणि 10 क्लबमधील 800 खेळाडूंचा सहभाग होता. अनुजच्या या यशाबद्दल इंडियन पिंच्याक सिल्याट फेडरेशनचे अध्यक्ष किशोर येवले यांच्यासह अनेक मान्यवरांनी अनुजचे अभिनंदन केले.

Exit mobile version