एनसीबी टीमने केला फिल्मी स्टाईलने पाठलाग
| खोपोली | प्रतिनिधी |
मुंबई-पुणे महामार्गावरून झायलो गाडीत गांजाची तस्करी केली जात असल्याची माहिती एनसीबी टीमला कळताच पुण्याहून फिल्मी स्टाईलने पाठलाग करीत खोपोली हद्दीतील लौजी हद्दीत 210 किलो गांजा जप्त करण्यात आला. गुरुवार, दि.1 सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली. खोपोली झालेल्या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.
खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरिष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. झायलो गाडीत 210 किलो गांजा सापडला असून, त्याची अंदाजे किंमत 10 ते 15 लाख रूपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
दोनशे दहा किलो गांजा जप्त
