पळस्पे फाटा येथे दोन लाखांची रोकड जप्त

स्थिर सर्वेक्षण पथकाची कारवाई

| पनवेल | वार्ताहर |

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 15 ऑक्टोबरपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. पनवेल 188 विधानसभा मतदारसंघ, निवडणूक विभाग अंतर्गत आचारसंहिता पथकांतर्गत स्थिर सर्वेक्षण पथकाने गुरुवारी (दि. 7) मुंबई-गोवा हायवे येथील पळस्पे फाटा चेक नाका येथे रस्त्यावरुन जाणार्‍या पांढर्‍या रंगाच्या टाटा पंच या गाडीला थांबवून तपासणी केली असता त्या गाडीमध्ये दोन लाखांची रोख रक्कम आढळून आली. दरम्यान, स्थिर सर्वेक्षण पथकाकडून ती जप्त करण्यात आली आहे.

ही कारवाई 188 पनवेल विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी पवन चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय पाटील, आचारसंहिता पथक प्रमुख भारत राठोड, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, संदिप कराड, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, संजय भालेराव, सहाय्यक खर्च निरीक्षक, विजय फासे, सहाय्यक खर्च निरीक्षक, संजय आपटे, आचारसंहिता पथक प्रमुख महेश पांढरे, आचार संनियंत्रण अधिकारी, शरद गिते, आचारसंहिता पथक सहाय्यक प्रमुख जी.एस. बहिरम, सहा. समन्वयक आचारसंहिता कक्ष, दिनेश भोसले, तुषार म्हात्रे, नितेश चिमणे, आशा डोळस, तसेच स्थिर सर्वेक्षण पथक क्र.03 पथकाचे प्रमुख संतोष पाटील, सहा. पथक प्रमुख संदीप पगडे, खांदेश्‍वर पोलीस ठाण्याचे पो.शि. काशिनाथ चव्हाण व म.पो.शि. सरला जाधव आदी उपस्थित होते.

Exit mobile version