। वरवंड । प्रतिनिधी ।
पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर वरवंड (ता.दौंड) येथे दोन एसटी बस गाडयांची समोरासमोर धडक होवून भीषण अपघात झाला. यामध्ये एक महिला मयत तर गंभीर व किरकोळ असे तब्बल 69 प्रवासी जखमी झाले. सोमवारी सव्वाएक वाजता हा अपघात झाला. सुवर्णा होले रा.पाटस ता.दौंड जि.पुणे असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे.
दोन्ही एसटीत रक्ताचा पडलेला सडा, अडकलेले प्रवासी, रडण्य-ओरडण्याचा आवाज या भयायनक दृष्याने नागरीकांचे अक्षरशः काळीज पिळवटुन गेले. यावेळी तात्काळ उपस्थित झालेल्या तब्बल 10 ते 12 रुग्णवाहीकेतुन जखमींना उपचारासाठी तालुक्यातील काही दवाखान्यात दाखल करण्यात आले.सध्या दिवाळीच्या सुटयांमुळे महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे.सोमवार दोन एसटी वाहनांच्या अपघातात हादरुन गेला.महामार्गाने जामखेड-पुणे ही एसटी जामखेड हुन पुण्याकडे जात होती. तर पुणे-तुळजापुर एसटी तुळजापुरकडे चालली होती. दुपारी सव्वा एक वाजता वरवंड येथील कौठीचा मळा भागात पुण्यकडे जाणारी जामखेड एसटी अचानक दुभाजकामधुन पलीकडयाच्या मार्गावर गेली.त्याचवेळी समोरुन तुळजापुर एसटी येत होती.या दोन्ही एसटींची समोरा समोर धडक होवून भीषण अपघात झाला.जामखेड एसटी अपघाता नंतर महामार्ग सोडुन काही अंतर उत्तर दिशेला जावुन थांबली.दोन्ही एसटीत एकुण 105 प्रवासी होते.
अपघाताचा प्रचंड आवाज होताच परीसरातील नागरीकांनी घटनास्थळी धाव घेवुन जखमींना मदत करण्यास सुरुवात केली.एसटीत अनेक प्रवासी गंभीर जखमी तर काही जण अडकलेले होते. दोन्ही एसटीचे चालक गंभीर जखमी झाले. नागरीकांनी मोठया शिताफिने प्रवासी बाहेर काढले. माहीती मिळताच पाटस पोलिस, महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरीक व पोलिसांनी पाटस टोल प्लाझा व खासगी दवाखान्यांच्या तब्बल 12 ते 13 रुग्णावाहीकेतुन प्राथमिक आरोग्य केंद्र, अक्षयनर्सिंग होम,हर्ष हॉस्पीटल, पाटील हॉस्पीटल व इतर दवाखान्यात उपचारासाठी जखमी प्रवाशांना दाखल केले. एकुण 69 प्रवासी जखमी झाले. यावेळी उपचार दरम्यान एका महीलेचा मत्यू झाला. मयताचा आणखीन आकाडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.