इरसाल गडावर दोन पर्यटक अडकले

| रसायनी | प्रतिनिधी ।

इरसाल गडावर दोन पर्यटक अडकले आहेत त्यांना मदतीची आवश्यकता आहे, असा मेसेज आला, आणि 19 जुलै ची इरसाल वाडी दुर्घटनेची आठवण ताजी करून गेली. सर्वांचा थरकाप उडाला, पण वयोवृद्ध कमळू पारधी, कौस्तुभ कुंभार, आविष्कार पाटील यांनी गड चढून त्यांची सुटका केली.

ठाणे येथील दोन युवक निखिल शिंदे (20) आणि तन्मय शिंदे (16) राहणार ठाणे चंदनीवाडा हे आज खालापूर तालुक्यातील इरसाल वाडीवर पर्यटनासाठी आले होते. आज धो- धो पाऊस पडत आहे, सोसायट्याचा वारा, पाऊस आणि धुक्याची चादर ज्याने समोरचे दिसत नव्हते, असे वातावरण निर्माण झाले होते. हे चित्र असल्याने युवक घाबरलेले आणि रस्ता चुकले, पुढे पाय टाकावा तर दरड त्यामुळे अपघाताची शक्यता, त्यामुळे त्यांना मदतीची गरज होती, त्यांनी जागचे हलवायचे नाही असे ठरवून त्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.112 नंबरवर फोन करून मदतीची गरज व्यक्त केली, आणि चौक चे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंगटे यांनी स्थानिक पोलीस, कमलू पारधी, निखिल मालुसरे, कौस्तुभ कुंभार, आविष्कार पाटील, गाव पोलीस पाटील यांच्या मदतीने या दोन तरुणांना सुरक्षित खाली उतरवून आणले. 19 जुलै 2023 रोजी इरसाल वाडीच्या दुर्घटनेला तीन वर्षे पूर्ण झाली. ही आठवण देणारी घटना ताजी असताना असा प्रसंग समोर आल्याने पोलिसांची तारांबळ उडाली होती. दोन तरुण निखिल मालुसरे आणि स्वप्निल सोनटक्के हे घटनाक्रमावर लक्ष ठेवून होते, कौस्तुभ कुंभार हा तरुण आविष्कार पाटील याला घेऊन इरसाल वाडी वर मदतीसाठी गेला. सर्वांशी संपर्क झाल्याने हा रेस्क्यू ऑपरेशन अत्यंत कमी वेळात आणि कुशलतेने पार पडले, सर्वांचा जीव भांड्यात पडला. कमळू पारधी (80) याच्या कुटुंबातील 19 जुलै 2023 रोजी घडलेल्या दुर्घटनेत पाच सदस्य काळा आड गेले तरीही नेहमीच प्रत्येक शोधकार्यात निस्वार्थ मदत करत असतात. तसेच पावसाची तमा न बाळगता गडावर पोहोचून कौस्तुभ कुंभार व सहकारी यांच्यासह दोन पर्यटकांना सुखरूप घेऊन आले. चौक सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंगटे यांनी कमलू पारधी, कौस्तुभ कुंभार, आविष्कार पाटील यांचा सन्मान केला.

Exit mobile version