दिवेआगर समुद्रकिनारी दोन बेवारस मृतदेह

दिघी सागरी पोलिसांकडून तपास सुरू
। श्रीवर्धन । वार्ताहर ।
श्रीवर्धन तालुक्यातील दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिवेआगर समुद्रकिनारी दोन बेवारस मृतदेह वाहून आल्याची घटना घडली आहे. बुधवारी (दि.8 सप्टेंबर) दिवेआगरच्या समुद्रकिनार्‍यावर अंदाजे 35 ते 40 वर्ष वयोगटातील पुरुषाचा मृतदेह सापडला असून, त्यापाठोपाठ दुसर्‍याच दिवशी गुरुवारी (दि.9 सप्टेंबर) देखील अंदाजे 30 ते 40 वर्ष वयोगटातील पुरुषाचा मृतदेह वाहून आला आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांच्यासह कर्मचारी दिवेआगर समुद्रकिनारी दाखल झाले. सदरचे मृतदेह बेवारस असून मृतांबाबत तसेच मृतांच्या नातेवाईकांचा शोध दिघी सागरी पोलिसांकडून घेतला जात आहे.

आपल्या हद्दीमध्ये कोणीही बेपत्ता असल्यास अथवा या प्रकरणांबाबत कोणतीही महत्वाची माहिती मिळाल्यास तात्काळ दिघी सागरी पोलिसांशी संपर्क साधावा अथवा 02147-224307/ 9175132606 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांनी केले आहे.

Exit mobile version