झाड कोसळून दोन वाहनांचे नुकसान

Oplus_0

| पनवेल | वार्ताहर |

वीर सावरकर चौकामध्ये गुरूवारी सकाळी चारचाकी आणि एका दुचाकीवर झाड पडल्याने दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत अग्निशमन विभागास कळवले असता पनवेल महापालिकेचे अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि आरोग्य कर्मचार्‍यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन झाडे तोडण्याच्या मशीनच्या साहाय्याने वाहनांवरील आणि रस्त्यावरील पडलेले झाड कापून बाजूला केले व रस्ता वाहतुकीस खुला करून दिला. याठिकाणी आरोग्य निरीक्षक जयेश कांबळे, कल्पेश पालेकर, सागर वर्तक, आशुतोष खानावकर, विकास घरत, सचिन मोहोकर आणि स्वच्छता कर्मचारी सहभागी होते.

Exit mobile version