नागाव येथे दुचाकीचा अपघात; उपचारादरम्यान चालक ठार

। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील नागाव सताड बंदर येथे दि. २८ मार्च रोजी दुचाकी शिकण्याकरिता इसम मुळाता राहणार साताड बंदर नागाव हा सुझुकी एक्सेस मोटार सायकल घेऊन नागाव रस्त्यावर चालवत होता. हयगईने व निष्काळजी तसेच अतिवेगाने दुचाकी चालवताना गाडीवरचा ताबा सुटून दुचाकींचा अपघात झाला व या अपघातात दुचाकीस्वारा गंभीर जखमी झाला होता.

उपचारादरम्यान दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून या घटनेबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेलं असून या अपघाताचा तपास पोलीस हवालदार शेलार हे करीत आहेत.

Exit mobile version