ताम्हिणी घाटात दुचाकी कोसळून अपघात; एकाचा मृत्यू

| माणगाव | प्रतिनिधी |

माणगाव-पुणे मार्गावर ताम्हिणी घाटात सणसवाडी गावाच्या हद्दीत दुचाकी पल्सर गाडी वळणावर येताच परिस्थितीकडे दुर्लक्ष करून रस्त्याच्या कडेला जाऊन दरीत कोसळून अपघात घडला. या अपघातात पाठीमागे बसलेल्या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.19) दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास घडली.

अपघाताबाबत माणगाव पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी  की, या अपघातातील दुचाकी चालक प्रवीण भागवत लोहगले (21) रा. बालेवाडी-पुणे हा पल्सर (एमएच-12-एचयू-0069) या गाडीवर मित्राला पाठीमागे  बसवून  बालेवाडी ते रायगड किल्ला असे ताम्हिणी घाटमार्गे जात असताना घाटातील वळणावर आल्यावर रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून रस्त्याच्या बाजूला असलेल्या दरीत दुचाकी कोसळून अपघात घडला. या अपघातात दुचाकीच्या पाठीमागे बसलेले वैभव शिवदास काळे (21) रा. बालेवाडी-पुणे यांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताच्या गुन्ह्याची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून आरोपी दुचाकी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताच्या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या  मार्गदर्शनाखाली  माणगाव पोलीस करत आहेत. 

Exit mobile version