एसटी बसला दुचाकीची धडक; एक जखमी

| माणगाव | प्रतिनिधी |

माणगावजवळ एसटी बसला व दुचाकीची धडक होऊन हा अपघात घडला आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीची एसटी बसला धडक बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जखमी होऊन दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. हा अपघात बुधवारी (दि.3) दुपारी 2:45 वाजण्याच्या सुमारास माणगाव तालुक्यातील भागाड गावच्या हद्दीत महाराष्ट्र सिमलेस कंपनीजवळ घडला. या अपघाताची तक्रार शुभम गणेश गडेकर (25) एसटी बस चालक रोहा डेपो यांनी माणगाव पोलीस ठाण्यात केली आहे.

अपघाताबाबत माणगाव पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी कि, अपघाताच्या गुन्ह्यातील दुचाकी चालक राजीव रंजन सिन्हा (40) रा. पॉस्को कंपनी  विळे भागाड ता. माणगाव याने त्याच्या ताब्यातील लाल रंगाची ऍक्टिव्हा स्कुटी हि गाडी पुणे बाजूकडून माणगाव बाजूकडे भरधाव वेगाने चालव येत असताना विरुद्ध दिशेला येऊन बस चालकाच्या लेनवर एसटी बसला धडक बसल्याने अपघात घडला आहे. या अपघातात दुचाकी स्वार राजीव रंजन सिन्हा हा जखमी होऊन दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. या अपघाताच्या गुन्ह्याची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताच्या गुन्हयाचा आधिक तपास पोलीस निरीक्षक माणगाव एन. बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पवार हे करीत आहेत.

Exit mobile version