ट्रेलरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

। गोवे-कोलाड । वार्ताहर ।
मुबंई गोवा महामार्गाला जोडला गेलेला कोलाड सुतारवाडी महामार्गावर भरधाव ट्रेलरने एका दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिल्याने यात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना सुतारवाडी येथील ढोकलेवाडी नजीक घडली आहे.

कोलाड पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोलाडकडून सुतारवाडीकडे भरधाव जाणारा ट्रेलर क्रमांक एम एच 048ए जी 5370 तर सुतारवाडी कडून येणारी दुचाकी वाहन क्रमांक एम एच 06 ए व्ही 2539 चालक मंगेश प्रकाश हिलम रा. निळज माणगाव वय (20) सुतारवाडी कडून कोलाडच्या दिशेने येत असतांना ढोकळेवाडी येथील वळणावर ट्रेलर चालकाने दुचाकीस्वार मंगेश हिलम यांच्या दुचाकीला थेट धडक दिल्याने या दुर्घटनेत मंगेश हिलम यांचा दुर्दैवी अंत झाला असून मालवाहू ट्रेलर चालक हा पसार झाला असल्याने या बाबत एकच संतप्त व्यक्त केला जात आहे.सदरच्या घटनेची कोलाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शखाली जे एस चेरकर व एस आर माने अधिक तपास करत आहेत.

Exit mobile version