| रसायनी | राकेश खराडे |
मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर नढाळ गावच्या हद्दीत मॅकडोनाल्डसमोर दुचाकी आणि महिंद्रा स्कॉर्पिओ यांच्यात झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. स्कॉर्पिओच्या अज्ञात चालकाने भरधाव आणि निष्काळजीपणे वाहन चालवून दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौक येथील ब्राह्मण आळी, विठ्ठल मंदिराजवळ राहणारे दुचाकीस्वार हिरो पॅशन मोटारसायकल (क्र. एमएच-06-एएम-0962) वरून बारवाई-पनवेल येथून चौक-खालापूरच्या दिशेने मुंबई-पुणे जुन्या महामार्गाने प्रवास करीत होते. यावेळी नढाळ गावच्या हद्दीतील मॅकडोनाल्डसमोर महिंद्रा स्कॉर्पिओ (क्र. एमएच-46-सीई-7940) वरील अज्ञात चालकाने वाहन अविचाराने, हयगयीने, बेदरकारपणे आणि अतिवेगाने चालवून दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताचा पुढील तपास श्रेणी पोलीस उपनिरीक्षक बहाडकर करीत आहेत.
स्कॉर्पिओच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
