। मुंबई । प्रतिनिधी ।
विरारमध्ये एक भीषण अपघात झाला. एका दोन वर्षांच्या मुलीला दुधाच्या पिकअप टेम्पोने धडक दिली. या अपघातात ती गंभीर जखमी झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
हा भीषण अपघात विरार पश्चिमेच्या डोंगरपाडा परिसरात घडला. सोमवारी (दि. 07) आत्माराम पार्क परिसरातील इमारतीच्या गेटजवळ दुधाचा पिकअप टेम्पो रिव्हर्स घेत होता. त्याचवेळी रिया सिंग या दोन वर्षीय मुलीला धडक बसली आणि ती चाकाखाली चिरडली गेली. यात ती गंभीर जखमी होऊन तिचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच विरार पोलीस घटनास्थळी तात्काळ हजर झाले. त्यांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. तसेच, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून टेम्पोचालकाला ताब्यात घेतले आहे.