पत्रकार हल्ला प्रकरणी लाक्षणिक उपोषण

नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील पत्रकार अजय गायकवाड यांना मारहाण करणार्‍या पोलीस कर्मचार्‍यास अटक करावी या मागणीसाठी रायगड प्रेस क्लबच्या माध्यमातून सोमवारी (21 फेब्रुवारी )अलिबाग येथे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे.
पत्रकार हल्ला विरोधी कायद्याच्या महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था हिंसा आणि मालमत्तेचे नुकसान अधिनियम 2017 चे कलम 4 खाली पत्रकार अजय गायकवाड यांना मारहाण करणार्‍या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला होता.
मात्र या गुन्ह्यातील संबंधित आरोपी हा पोलीस कर्मचारी असल्याने पोलिसांनी अद्याप त्या तरुणाला अटक केली नाही त्यामुळे लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला

Exit mobile version