विज्ञान प्रदर्शनात यु.ई.एस स्कूल प्रथम

| उरण । वार्ताहर ।

उरण पंचायत समिती, शिक्षण विभाग व जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्था न्यू इंग्लिश स्कूल मोरा यांच्या संयुक्त विदयमाने तालुका विज्ञान प्रदर्शन जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्था न्यू इंग्लिश स्कूल मोरा येथे आयोजन करण्यात आल होते. तंत्रज्ञान आणि खेळणी ह्या विषयावर आधारित ह्या विज्ञान प्रदर्शनात, 25 शाळांनी आपापल्या प्रकल्पाच्या प्रतिकृती उभारल्या होत्या. यु.ई.एस. स्कूल व ज्यु. कॉलेजच्या अकरावी सायन्स मधील 9 विदयार्थ्यांनी छाया नाखवा, किरण कोळी व कल्याणराव भदाणे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली जलजीवनासाठी वायुजीवनप्रणाली ह्या विषयावर आधारित प्रतिकृती उभारली होती. त्यास प्रथम क्रमांक मिळाला.

संस्थेचे अध्यक्ष तनसुख जैन, मिलिंद पाडगावकर, आनंद भिंगार्डे, चंद्रकांत ठक्कर, अ‍ॅड. राजेंद्र भानुशाली, विश्‍वास दर्णे, सोनाली म्हात्रे, सिमरन दहिया, सिनियर कॉलेजच्या एचओडी, पूर्व-प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक विभागातील सुपरवायझर्स ह्या सर्वांनी सर्व विदयार्थ्यांना जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version