| नवी दिल्ली | वृत्तसंस्था ।
गेल्या काही वर्षांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. दोन्ही देश एकमेकांच्या शहरांवर हल्ले करत आहेत. या दोन्ही देशातील संघर्ष अद्याप संपलेला नाही. अशात आता पुन्हा युक्रेननं रशियावर 1000 हून अधिक ड्रोन्सने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं मोठी खळबळ उडाली आहे. अधिकाऱ्यांनी रविवारी (20 सप्टेंबर) दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनच्या सैन्यानं रात्रीच्या वेळी रशियावर 1000 हून अधिक ड्रोन्स डागले. यामध्ये रशियाची राजधानी मॉस्कोवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला आहे. या हल्ल्यात रशियाच्या ऑइल रिफायनरीचं मोठं नुकसान झालं आहे. तसेच मॉस्कोमध्ये दोन लोकांचा मृत्यू झाला असून, 20 जण जखमी झाल्याची माहिती येथील स्थानिक गव्हर्नर आंद्रेई वोरोब्योव्ह यांनी दिली.






