उमेद मैत्री मेळा उत्साहात

। अलिबाग । वार्ताहर ।

रायगड जिल्हा व्यवस्थापन कक्ष व अलिबाग तालुका व्यवस्थापन कक्ष अंतर्गत स्वराज्य महिला ग्रामसंघ कुणे-उसरकडून महिलांसाठी सोमवारी (दि.10) ‘उमेद मैत्री मेळा’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन स्वराज्य ग्रामसंघ अध्यक्ष कल्पिता शिंदे यांच्या हस्ते व सरपंच अजय नाईक, सुचिता म्हात्रे, विशाखा गायकर, जिया धसाडे, सुप्रिया धसाडे व समीक्षा मांडे यांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमात महिलांच्या कार्याचा सन्मान करत त्यांच्या योगदानाची दखल घेण्यात आली. तसेच, क्रीडा, सामाजिक, उद्योग, कृषी, सेवा या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांना ‘स्वराज्य यशस्विनी’ पुरस्कार आणि सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात स्त्री शक्तीचा गजर व जागर, सांस्कृतिक तसेच विविध मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

Exit mobile version