अमरधाम येथील विजेचे खांब भूमिगत करा

विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांची मागणी
पनवेल | वार्ताहर |
पनवेल अमरधाम येथील विजेचे खांब भूमिगत करावी, अशी मागणी पालिका विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी केली आहे. पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांनी अमरधाम येथे रस्त्याची पाहणी केली. दोन दिवसांपूर्वी रात्री विजेच्या खांबाला एक कार धडकली. या धडकेत कारचे नुकसान झाले. या घटनेवरून रस्त्याच्या मधोमध असणारे विजेचे खांब अपघातांना आमंत्रण देत असल्याचे समोर आले. त्याची माहिती विरोधी पक्षनेते  म्हात्रे यांना समजतात त्यांनी महावितरणचे कर्मचारी, अधिकारी तसेच महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांना सोबत घेऊन येथील रस्त्यांची पाहणी केली.
यावेळी धोकादायक ठरत असलेल्या विजेचे खांब भूमिगत करण्यासाठी सांगितले तसेच येथील ड्रेनेजची कामे, स्ट्रीट लाईटची अर्धवट आहेत ती कामे देखील पूर्ण करण्यासाठी विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांनी सांगितले आहे. विकास कामाँमध्ये विजेचे पोलचे अडथळे येतात त्याचे टेंडर निघाले आहेत. वर्क ऑर्डर निघनार आहेत ते झाल्यावर येथील पोल काढ़नार असल्याची माहिती पालिकेचे विद्युत विभाग प्रमुख प्रीतम पाटील यानी सांगितले.

Exit mobile version