खड्ड्यात पडून मुलाचा दुर्दैवी मृत्यू

| पनवेल | वार्ताहर |

करंजाडे येथे इमारतीच्या समोर खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात पडल्याने तीन वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेची नोंद पनवेल शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. रियान केशर खाडकी (रा. शंभूराजे अपार्टमेंट, करंजाडे) असे मृत मुलाचे नाव आहे. या ठिकाणी एका इमारतीचे बांधकाम सुरु आहे. त्या ठिकाणी खड्डा करण्यात आला होता. रियान हा खेळताना त्या खड्ड्यामध्ये पडला. त्याला उपजिल्हा रुग्णालय, पनवेल येथे नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणाचा तपास पनवेल शहर पोलिस करत आहेत.

Exit mobile version