महाडमधील दुर्दैवी घटना! मित्राला वाचवण्याच्या प्रयत्‍नात तरूणाचा मृत्यू

| महाड | प्रतिनिधी |

महाडमधील रानवडे येथील सातसडा धबधब्यावर फिरायला गेलेल्या असताना 22 वर्षीय तरूणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अंकित विलास महामोलकर असे मृत तरूणाचे नाव आहे. रविवारी (दि.21) आपल्या मित्रांसोबत धबधब्यावर फिरायला गेला असता पाण्यात एका मित्राला बुडताना बघून अंकितने पाण्यात उडी मारली. यावेळी त्‍याचे पाण्यातील दगडावर डोके आपटून डोक्याला जबर मार लागला व त्‍याचा मृत्यू झाला. मात्र, बुडणारा तरूण सुरक्षित आहे.

Exit mobile version