श्रीवर्धन किनारी अज्ञात मृतदेह

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

श्रीवर्धन समुद्रकिनारी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह समुद्राच्या पाण्याबरोबर वाहून येऊन वाळूमध्ये रुतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. मृतदेह हा 55 ते 60 वर्ष वयापर्यंतच्या इसमाचा असल्याचे दिसून येत आहे. मृतदेहाच्या अंगामध्ये फुल अंडरवेअर व फिक्कट गुलाबी रंगाचा शर्ट असल्याचे दिसून येत आहे. त्याचे केस पांढरे झालेले असल्याने त्याला मेहंदी लावलेली दिसून येत आहे. मृतदेह मिळाल्याची माहिती मिळताच श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे कर्मचारी व अधिकारी त्या ठिकाणी दाखल झाले.

सदरचा मृतदेह पोलिसांनी पंचनामा करून ताब्यात घेतला असून, शव विच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय श्रीवर्धन या ठिकाणी नेण्यात आला आहे. सदर अज्ञात व्यक्तीची अद्यापपर्यंत ओळख पटलेली नाही. सदरचा अनोळखी इसम हा बोटीवरील खलाशी असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पहाटेच्या वेळी समुद्रात पडल्याने त्याचा मृत्यू झाला असून, कालच अमावस्या झाली असल्याने समुद्राला मोठी भरती आली होती. त्यामुळे खालचा जीवना कोळीवाडा या ठिकाणी हा मृतदेह आढळून आला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक उत्तम रिकामे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लहाने हे करीत आहेत.

Exit mobile version