अखिल दशानेमा गुजराती वैष्णव समाजाची कार्यकारिणीची बिनविरोध निवड

। पाली/गोमाशी । वार्ताहर ।
अखिल श्री दशानेमा गुजराती वैष्णव (वणिक) समाज, महाराष्ट्र, पुणेची वार्षिक सभा माणगाव येथे नुकतीच उत्साहात संपन्न झाली. या सभेत सन 2022 ते 25 च्या नवीन कार्यकारिणीची निवडणूक बिनविरोध पार पडली. माजी अध्यक्ष अरुण यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. या कार्यकारिणीचे अध्यक्ष अशोक मेहता-पाली, कार्याध्यक्ष कांतीलाल शहा-पुणे व केदार गांधी-माणगाव, उपाध्यक्ष विजय शेठ-पुणे, संजय बुटाला-खेड व सुजाता मेहता-लोणावळा, तर सचिव पदी शैलेश धारिया पुणे-पाली, सहसचिव श्रावणी शहा-पोलादपूर व राजेश मेहता-पुणे, खजिनदार रमेश गुजराथी-पुणे, सहखजिनदार जितेश शेठ-पुणे, सुनील मोदी-पेण, आणि अंतर्गत हिशोब तपासनीस अ‍ॅड. प्रकाश गांधी यांची निवड झाली आहे.

Exit mobile version