पोलादपूर खासगी वाहतूकीला उत

| पोलादपूर । वार्ताहर ।

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 17 वर पोलादपूर एस.टी.बस स्थानक रायगड जिल्हयातील शेवटचे मोक्याचे बसस्थानक आहे. राष्ट्रीय महामार्ग अंडरपास जाण्यास सुरूवात झाल्यानंतर या एस.टी.बसस्थानकाचे महत्व काहीसे कमी झाले असून तालुक्यातील प्रवाशांना एस.टी.गाडयांऐवजी खासगी लक्झरी बसने प्रवास करण्याची अपरिहार्यता निर्माण झाली आहे. सध्या सर्व्हिसरोडवरून मोठया संख्येने खासगी प्रवासी वाहतूक सुरू झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे बसस्थानक असून याठिकाणाहून रत्नागिरी, सातारा आणि मुंबईच्या दिशेने एस.टी.गाडयांतून प्रवासी वाहतूक होत असते. गेल्या काही वर्षांपासून स्थानकाच्या 100 मीटर परिसरातून खासगी लक्झरी बसेसद्वारे तालुक्यातील प्रवाशांची दररोज वाहतूक सुरू झाली आहे. यादरम्यान, कोणत्याही प्रवाशाकडून विनातिकिट प्रवासापोटी अव्वाच्यासव्वा रक्कम घेऊन असुरक्षित प्रवासी वाहतूक करताना पोलादपूर एस.टी.स्थानकातील मुंबई, पुणे, सातारा व महाबळेश्‍वर मार्गावरील प्रवासी फेर्‍या कशा कमी होतील, याकडे अर्थपूर्ण लक्ष दिलेले दिसून येत आहे. या वाहनांतून प्रवास करणारे प्रवासी किती सुरक्षित आहेत, याबाबत कोणतीही चर्चा घडून येत नाही.

Exit mobile version