Rain Alert: रायगडात अवकाळी पावसाची हजेरी

| रायगड | प्रतिनिधी ।

रायगड जिल्ह्यात हवामान विभागाकडून अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार आज रायगडातील काही भागात अवकाळी पाऊस पडल्याने हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला. शुक्रवारी दुपारनंतर मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडला. हवामानात झालेल्या बदलांमुळे मेघगर्जना विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. त्यानुसार रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या. जिल्ह्यात महाड, माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन, कर्जत खोपोली परिसरात दुपारनंतर आभाळ भरून आले. मेघगर्जना, ढगांच्या गडगडाटासह पाऊस सुरू झाला. अचानक वातावरण बदलून पाऊस सुरू झाल्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली. परंतु, या अवकाळीमुळे रायगडकरांना उष्म्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

Exit mobile version