अवकाळीचा जोरदार तडाखा

कार्लेत वीज पडून बैल ठार
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबागसह संपूर्ण रायगडात गुरुवारी पहाटे आणि संध्याकाळी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.शिवाय सायंकाळी अलिबाग तालुक्यातील कार्ले येथे वीज पडून एक बैल ठार झाल्याची घटना घडली.
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याने रायगडसह राज्यात अवकाळी पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्यान दिला होता.त्यानुसार गुरुवारी पहाटे जोरदार पाऊस पडला.पावसामुळे हवेतील गारवाही गायब झाला होता.सकाळच्या वेळी कमालीचा उष्मा जाणवत होता.सायंकाळीही पावसाने जोरदार हजेरी लावली.यामध्ये कार्ले येथील शेतकरी हरीश्‍चंद्र लक्ष्मण पाटील यांच्या मालकीचा बैल वीज पडून ठार झाला.दरम्यान,या अवकाळी पावसाचा फटका रब्बी पिके,वीट व्यवसायाला मोठ्या प्रमाणात बसला आहे.

Exit mobile version