कॅगच्या मुख्यालयात सरदार पटेलांच्या पुतळ्याचे अनावरण

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
ऑडिट दिनाच्या निमित्ताने भारतीय कॅगच्या मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात सहभागी झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
यावेळी सभेला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, एक संस्था म्हणून कॅग फक्त देशाच्या खात्यांचा हिशोब पाहते असं नाही तर प्रोडक्टिव्हिटीमध्ये व्हॅल्यु अ‍ॅडिशनचे कामही करते. यासाठीच ऑडिट दिन आणि त्याच्याशी संबंधित कार्यक्रम आपल्या चिंतनाचा आणि सुधारणांचा महत्त्वाचा भाग आहेत.
एक वेळ अशी होती की देशातील ऑडिटकडे शंकेनं पाहिलं जात होतं, एक भीती असायची. कॅग विरुद्ध सरकार असं आपल्याला वाटत होतं. पण आज ही मानसिकता बदलली. आता ऑडिटला व्हॅल्यु एडिशनचा महत्त्वाचा भाग मानलं जातं असंही मोदींनी म्हटलं.

Exit mobile version