नाशिकला २०२७ मध्ये आगामी कुंभमेळा

। नाशिक । प्रतिनिधी ।
नाशिक येथे २०२७ मध्ये आगामी कुंभमेळा होणार असून, त्याच्या तारखा पुढील नियोजनासाठी पुरोहित संघ त्रंबकेश्‍वर यांच्या वतीने महामंत्री हरिगिरी यांच्याकडे देण्यात आल्या. येथील श्रीपंच शंभु दशनाम जुना आखाडा येथे अखिल भारतीय आखाडा परिषदेच महामंत्री हरिगिरी महाराज आठ दिवसांपासून वास्तव्यास आले आहेत. त्यांच्या उपस्थिती मध्ये जुना आखाड्यातील साधु महंत यांनी हजेरी लावली असुन आघाड्याचे अंतर्गत प्रश्‍नावर येथे विविध निर्णय घेण्यात आले आहे. आषाढ शुद्ध प्रतिपदा व गुरुपुष्यांमृत योगाचे औचित्य साधुन महामंत्री हरिगिरी, या आघाड्याचे महामंडलेश्‍वर शिवगिरीजी, श्री पंचायती आनंद आघाड्याचे गणेशाने सरस्वती, जुना आखाड्यातील विष्णुगिरी, निळकंठ गिरी, ईच्छागिरी , साध्वी शैलजा माता यांनी सकाळी कुशावर्तातीर्थात स्नान करुन आद्य ज्योतिर्लिंग त्रंबकेश्‍वराचे दर्शन व अभिषेक पूजा केली. त्यांच्या समवेत आघाड्याचे पुरोहित त्रिविक्रम जोशी व प्रमोद बाळकृष्ण जोशी उपस्थित होते.

Exit mobile version