अद्ययावत संगणक कक्षाची उभारणी

रोटरी क्लब मलबार हिलकडून 40 लाखाची तरतूद

| नेरळ | प्रतिनिधी |

मुंबई येथील विद्या मंदिर मंडळाच्या नेरळ येथील महाविद्यालयासाठी अद्ययावत संगणक कक्ष रोटरी क्लब मलबार हिल यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आला. या संगणक कक्षाच्या उभारणीसाठी साधारण 40 लाख रुपये खर्च आला असून विद्यार्थ्यांची पटसंख्या आणि शाळेचा परिसर पाहून रोटरी क्लबकडून शाळेच्या व्यवस्थापन टीमचे कौतुक करण्यात आले.

रोटरी क्लब मलबार हिल यांच्याकडून विद्या मंदिर मंडळाच्या विनंतीनुसार नेरळ येथील नाडकर्णी आजी शैक्षणिक संकुलात संगणक कक्ष उभारून देण्यात आला. अद्ययावत आणि सर्व सुविधांनी परिपूर्ण अशा संगणक कक्षाचे उद्घाटन सोहळा नेरळ ममदापूर येथील नेरळ विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आला होता. रोटरी क्लब ऑफ मलबार हिलचे अध्यक्ष सुरेश डोंगरे यांचे हस्ते झाले. त्यावेळी आयोजित उद्घाटन सोहळ्याला व्यासपीठावर संस्थेचे कार्याध्यक्ष शशिकला मुळ्ये, रोटरीचे सुनील तलवार, संयुक्त सचिव विवेक पोतदार हे प्रमुख उपस्थित होते. या कार्यक्रमाला विद्या मंदिर मंडळाचे संयुक्त सचिव अर्चना खळे, संस्थेचे लेखा परीक्षक सुरेश देशमुख, विश्वस्त डॉ. भरतकुमार लाड, डॉ. मिलिंद पोतदार, वंदना कोरगावकर, कार्यकारिणी सदस्य सुशांत बदले, रमेश कुंभार, आदीसह रोटरी क्लबचे सुरेश पांचोदि, पल्लवी संघवी, नमना सचदे, किशोर पांचो, राधिका मणियार,लोमेश, विपुल ठक्कर, प्रमोद पटेल, कपा कापडियन आदी सदस्य देखील उपस्थित होते. संस्थेचे नेरळ विद्या मंदिर शाळेचे मुख्याध्यापक, सुमती टिपणीस महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्यासह माजी विद्यार्थी संघटना यांचे पदाधिकारी आणि शिक्षक वर्ग उपस्थित होता.

Exit mobile version