उर्दु शाळेचा शंभर टक्के निकाल

।अलिबाग । प्रतिनिधी ।

दहावीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. अलिबाग नगर परिषद उर्दू माध्यमिक शाळेचा निकाल शंभर टक्के लागला. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांवर वेगवेगळ्या क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या परिक्षेत इफ्फत कमरोद्दीन शेख याने 79.20 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. शमा कासिम शेख यांनी 75.40 टक्के गुण मिळवून द्वितीय तर मरियम मौला शेख यांनी 71.60 टक्के मिळवून तृतीय क्रमांक मिळवला. दहावीच्या परीक्षेत प्रथम श्रेणीने व द्वितीय श्रेणीने प्रत्येकी दहा अशा एकूण 20 विद्यार्थ्यांनी गुण मिळवले. यावेळी अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, माजी उपनगराध्यक्षा अ‍ॅड. मानसी म्हात्रे, माजी नगर सेविका वृषाली ठोसर आदींसह मुख्य कार्यकारी अधिकारी अंगाई साळुंखे यांनी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे व उर्दु शाळा कमिटीचे अभिनंदन केले .

Exit mobile version