हिंदू मुस्लिम ऐक्य जपणारा उरूस

ॲड. आस्वाद पाटील यांनी घेतले सपत्नीक दर्शन

| भाकरवड | वार्ताहर |

अलिबाग तालुक्यातील सुप्रसिद्ध पोयनाड बाजारपेठेत असलेल्या जमाउदीन शहा बाबांचा उरुस मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अँड. आस्वाद पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अर्थ बांधकाम सभापती चित्रा पाटील, माजी सरपंच भूषण चवरकर, अजित चवरकर, जनार्धन स्वामी पेण, अमरनाथ राऊत, वसंत शिंगासने, मेहताब आलम, अन्वर बुरानं, हैदर पठाण, मनोज चाचर, आयुफ औसेकर, मुराद बुरान, रविकांत पाटील, वसीम मुजावर, अतुल चवरकर, महेश टेमकर, शैलेश गायकवाड आदी मुस्लिम, हिंदू समाजाचे मान्यवर उपस्थित होते. या उरुसासाठी पोयनाड पोलीस ठाण्याचे नवनिर्वाचित सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष दराडे, पोलीस नाईक राकेश मेहेतर यांनी प्रमुख उपस्थिती लावली. यांचाही सत्कार दर्गा समितीचे अध्यक्ष सुभाष पाटील यांनी केले.

या वेळी प्रथम वाजतगाजत बाबा जमालउद्दिन यांच्या दर्ग्यामधुन संदल मिरवणूक काढण्यात आली. ती सोमवार बाजारपेठ येथील दर्ग्यात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर मच्छिमार्केट व पोयनाड नाका येथून परत जमाउदीम शहा बाबांच्या दर्ग्यात येऊन पोथी वाचन व त्यानंतर फुलांची चादर चढवणे असा दिनक्रम होता पोयनाडचा उरूस म्हणजे सर्वधर्म समभाव म्हणून गेल्या सत्तरहुन अधिक वर्षाची परंपरा जपत नित्यनेमाने साजरा करण्यात येत आहे. या संपूर्ण कार्यक्रमाची व्यवस्था व जबाबदारी दर्गा समितीचे अध्यक्ष सुभाष पाटील यांनी पाहिली.

Exit mobile version