अमेरिकेच्या शिष्टमंडळाची एलिफंटाला भेट

। उरण । वार्ताहर ।
अमेरिकेच्या विविध शासकीय वरिष्ठ श्रेणीतील अधिकार्‍यांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी जागतिक कीर्तीच्या एलिफंटा लेण्यांना भेट दिली. एलिफंटा बेटावर कलचुरी घराण्याच्या कारकीर्दीत कोरण्यात आलेल्या अतिप्राचीन कोरीव लेण्या आहेत. काळ्या पाषाणात योगेश्‍वर शिव, रावणानुग्रहमूर्ती, शिवपार्वती, अर्धनारीनटेश्‍वर, गंगावतरण शिव, शिवपार्वती विवाह, अंधकारसुर वधमूर्ती, नटराज शिव आणि मुख्य आकर्षण असलेली महेशमूर्ती अशी शिवाची विविध रूपे या कोरीव शिल्पात कोरलेली आहेत. अमेरिकेच्या दहा अधिकार्‍यांच्या शिष्टमंडळाला येथील गाईडने ऐतिहासिक शिवकालीन लेण्यांची माहिती करून दिल्याचे प्रांत अधिकारी राहुल मुंडके यांनी सांगितले.

यावेळी मंत्रालयातील विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, प्रांत अधिकारी राहुल मुंडके, उरण तहसीलदार अभिषेक खोले, घारापुरी सरपंच बळीराम ठाकूर, सदस्य, पोलीस अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version