। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
आफ्रिकेतील ओमीक्रॉन महाविषाणू आता रायगड जिल्ह्यात येऊन पोहोचला आहे. जिल्ह्यातील अनेकांनी आजही लस घेतली नाही. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी कोरोनाला गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. या विषाणूच्या संसर्गाबाबत नागरिकांनी भीती न बाळगता लवकरात लवकर लस घ्यावी, या उद्देशाने शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या पुढाकारातून लस घ्या, मोफत धान्य मिळवा हा उपक्रम बुधवार (दि.9) पासून राबविण्यात येत आहे. सकाळी अकरा वाजल्यापासून तोडकरी हॉस्पीटलमध्ये लसीकरणाला सुरुवात झाली.
तोडकरी हॉस्पीटलमध्ये लसीकरणाला सुरुवात; चित्रलेखा पाटील यांच्यातर्फे मोफत धान्य वाटप
