सलग दुसऱ्या दिवशी अलिबाग शहरातील लसीकरण बंद


लसीचा साठा संपल्याची प्रशासनाची माहिती
। अलिबाग। विशेष प्रतिनिधी ।
कोरोना प्रतिबंधित लसिकरणाचे डोस संपल्याने मंगळवार दि. 8 जुन नंतर सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी देखील अलिबाग नगरपरिषदेच्या लसीकरण केंद्रासह जिल्ह्यातील बहुतेक लसीकरण केंद्रांवरील लसीकरण बंद करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

अलिबाग तालुक्यासह जिल्ह्यातील बहूतेक लसीकरण केंद्रातील डोसचा साठा संपला आहे. त्यामुळे मंगळवारी नागरिकांचे लसीकरण झाले नाही. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी 9 जून रोजी देखील लसीकरण होणार नसल्याचे सांगण्यात आले. नव्याने प्राप्त झालेल्या डोस नंतर पुढील सुचना देऊन लसीकरण पुर्ववत होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Exit mobile version