। तळा । वार्ताहर ।
देशात कोव्हिड-19च्या संभाव्य तिसर्या लाटेची तीव्रता कमी करण्यासाठी मिशन कवच कुंडले या योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यात 8 ते 14 ऑक्टोबर 2021या कालावधीत विशेष लसीकरण मोहीम गावोगावात राबविण्यात येत आहेत. यामध्ये महिलासाठी नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने विशेष मोहीम राबविण्यात येत असून प्रत्येक गावात स्वतंत्र नियोजन करण्यात येणार आहे.
तालुक्यातील तळा उपकेंद्र मांदाड, महागांव परिसरातील सर्व वाड्यावस्तीतील सर्वांनी लसीकरण करून घेऊन संभाव्य तिसर्या लाटेची तीव्रता रोखण्यास मदत होणार आहे. याप्रसंगी माहिती देताना तालुका कोरोना मुक्त करण्यासाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक आहेत. हे आपल्या भल्यासाठी असून आरोग्य प्रशासनाला विशेष सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार ए.एम.कनशेट्टी यांनी केले आहे.
शासनाच्या आरोग्य विभागाने मिशन कवच कुंडले मोहीम यशस्वी करण्यासाठी तालुक्यातील सरंपच, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, तलाठी, ग्रामसेवक, आशा गटप्रवर्तक, आरोग्य विभागातील कर्मचारी, पोलीसप्रशासन, एकात्मिक बालविकास प्रकल्प विभाग सज्ज करण्यात आले आहेत.