| आंबेत | वार्ताहर |
म्हसळा तालुक्यातील आंबेत विभागातदेखील दुसर्या लसीकरणला सुरुवात झाली असून, पहिल्याच दिवशी नागरिकांनी शंभरी गाठत आरोग्य विभागाला चांगला प्रतिसाद दिला. यावेळी एकशे अठरा जणांचे आंबेतमध्ये लसीकरण करण्यात आले, त्यामुळे परिसरातील जनतेचे आरोग्य विभागाकडून कौतुक होत आहे. यावेळी खामगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. गीतांजली हंभीर, आरोग्य सेवक मंगेश चव्हाण, आशा सेविका, नर्स व इतर आरोग्यकेतर कर्मचारी उपस्थित होते.