वडखळ मॉडेल गाव बनवणार: राजेश कुमार

। पेण । प्रतिनिधी ।

वडखळ येथील तलावाचे सुशोभीकरण कामाची पाहणी करताना जेएसडब्ल्यू स्टील कंपनीचे व्हाईस चेअरमन राजेश कुमार रॉय यांनी बोलताना सांगितले की, वडखळ ग्रामस्थांना मी एक चॅलेंज दिले हेाते की, वडखळ गाव महाराष्ट्रामध्ये आपल्याला एक मॉडेल गाव म्हणून बनवायचे आहे आणि ते चॅलेंज मी माझ्या स्वतःच्या जबाबदारीवर दिले होते. आणि या कामासाठी लागणारी जबाबदारी कंपनी पूर्णपणे करणारच जेणेकरून भविष्यात वडखळकडे बघताना महाराष्ट्रातील एक उत्तम खेडं आणि डिजिटल खेडं म्हणून पहावे.

पूर्ण तलाव सुशोभिकरण झाल्यानंतर एक उत्तम पर्यटन स्थळ होऊ शकतो. कारण या तलावाच्या भोवती असणारी संरक्षण भिंत, त्याच्याभोवती असणारी गार्डनिंग, त्याच्याभोवती जॉगिंग ट्रॅक आणि मग आठवडा बाजार अशी संपूर्ण हया तळयाची रचना ही येथील सरपंचांनी व त्यांच्या सहकार्यांनी भविष्याचा विचार करून ही रचना केली आहे. तसेच, तळावामध्ये गणपती विसर्जनासाठी स्वतंत्र घाटाची व्यवस्था केली आहे. ही देखील कल्पना उत्तम आहे जेणेकरून भविष्यात या पाण्याचे प्रदूषण होणार नाही याची पूर्ण खबरदारी येथील ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांनी घेतलेली आहे. हे एक नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. तसेच यावेळी सरपंच शिवानी विश्वास म्हात्रे यांनी सांगितले की, मला राजकारणातला अनुभव कमी असेल परंतु माझ्या सहकाऱ्यांच्या अनुभवाची भेटणारी मोलाची साथ यावर गावाचा कायापालट भविष्यात नक्कीच होणार मी पदभार सांभाळल्यानंतर अवघ्या सहा महिन्याच्या आतच या गावांमध्ये विकासाच्या कामांना सुरूवात केलेली आहे. ती कामे नक्कीच गावाच्या भूषणावल असतील. माझे  सहकारी मला पूर्णपणे मदत करत आहेत मग त्यामध्ये योगेश पाटील असतील निलेश म्हात्रे असतील तसेच उपसरपंच मत्स्यगंधा म्हात्रे असतील व माझे ग्रामपंचायतीतील सर्व सदस्य यांच्या सहकार्याशिवाय ही कामे करणे मला सोपे नव्हते. परंतु आज आपण एक एक पाऊल विकासाच्या दृष्टीने या ग्रामपंचायतीमध्ये उचलत आहोत. नक्कीच भविष्यात या गावाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही, असे शिवानी म्हात्रे म्हणाल्या.

या पाहणी दरम्यान उपसरपंचा मत्स्यगंधा म्हात्रे, सदस्य नुतन म्हात्रे, विनोदिनी कोळी, योगिता मोकल, मनाली पाटील, अपुर्वा म्हात्रे, अनिकेत म्हात्रे, मिलींद मोकल, संजय पवार, सुनिल जांभळे, दिलीप पाटील, महेंद्र पाटील, रविंद्र पाटील, अनिकेत म्हात्रे, पांडूरंग म्हात्रे, प्रभाकर म्हात्रे आणि ग्रामसेवक विकास कुंभार आदी उपस्थित होते.

Exit mobile version