73 किमीचा सायकल प्रवास करत शहिदांना वाहिली आदरांजली

। नेरळ । प्रतिनिधी ।
नेरळ येथे राहणारे पेशाने वकील असलेले क्रीडापट्टू 47 वर्षीय गजानन डुकरे यांनी बुधवारी आपल्या देशाच्या 73 व्या प्रजासत्ताक दिनी सायकल वरून प्रवास करीत 73 किमी हे अंतर पार करीत देशासाठी शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहिली आहे. यासाठी त्यांनी 73 किलोमीटरचे हे अंतर त्यांनी तीन तासात एकदाही न थांबता पार केले.
वकील क्षेत्रात कार्यरत असलेले कर्जत तालुक्यातील नामवंत अ‍ॅढ.गजानन पालू डुकरे हे गेली अनेक वर्षे छंद म्हणून सायकल वरून रनींग करीत आहेत. परंतु हे करीत असताना देश भरातून वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून सायकल रनींगच्या स्पर्धेत सहभाग घेऊन अनेक रेकॉर्ड त्यांनी आपल्या नावावर नोंदवले आहेत. देशाचा 73 वा प्रजासत्ताक दिन देशभरात उत्साहात साजरा होत असताना अ‍ॅड.डुकरे यांनी मात्र देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देणार्‍या वीर जवानांना आदरांजली वाहण्यासाठी संकल्प केला होता. देशाच्या 73व्या प्रजासत्ताक दिनी 73 किलोमीटरचे हे अंतर अवघ्या 3 तासात पार केले. जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असणार्‍या माथेरानच्या पायथ्या जवळील नेरळ गावातील खांडा भागातील आपल्या घरातून सकाळी सव्वा सात वाजता सायकल वर टांग टाकणारे गजानन पालू डुकरे यांनी कल्याण-कर्जत राज्यमार्ग रस्त्यावरील नेरळ ते कर्जत या मार्गावर दोन फेर्‍या अशा दोन फेर्‍या तसेच नेरळ ते वांगणी एक फेरी असे ऐकून 73 किलोमीटर अंतर सायकल वरून केवळ 3 तास सायकल वरून खाली न उतरता पार केले. 73 किलोमीटर अंतर पार केल्यावर गजानन डुकरे यांचे स्वागत करण्यासाठी त्यांचा मित्र परिवार मोठ्या संख्येने हजर होता.त्याचवेळी सकाळ पासून त्यांचे मित्र सायकलच्या मागे दुचाकी घेऊन साथ देत होते.

Exit mobile version