ॲड. गजानन डुकरे यांचा सायकल प्रवास
नेरळ, प्रतिनिधी
कर्जत तालुक्यातील प्रसिद्ध क्रीडापटू ॲड. गजानन डुकरे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभर राबविल्या जात असलेल्या ‘माझी माती, माझा देश’ या उपक्रमात सायकल चालवून सहभाग घेतला आहे. भारताचा राष्ट्रध्वज आपल्या सायकलवर लावून काल 63 आणि आज 75 किलोमीटर एवढे अंतर पार केले. एक छंद म्हणून सायकल चालवत असलेल्या ॲड. गजानन डुकरे यांनी दरवर्षी आपल्या देशाचा स्वातंत्र्यदिन सायकलवरून 70-100 किलोमीटर प्रवास करून साजरा करीत असतात. यावर्षी भारतात माझी माती माझा देश हा उपक्रम देशाचे पंतप्रधान यांनी राबविण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार ॲड. डुकरे यांनी सायकलवर भारताचा तिरंगा ध्वज लावून प्रवास करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या उपक्रमाची सुरुवात डुकरे यांनी 13 ऑगस्ट रोजी तब्बल 63 किलोमीटर अंतर सायकलवरून न थांबता पार केले होते. तर आज 14 ऑगस्ट रोजी 75 किलोमीटर अंतर पार केले. आपल्या सायकलसोबत देशभक्तीपर गीते यांची साथ त्यांच्या या सायकल रॅलीमध्ये होती. कारमध्ये डिजे आणि पुढे सायकल अशी ही सायकल फेरी सकाळी साडेसहा वाजता सुरू झाली. त्यांना शैलेश नांदे आणि सौरभ डुकरे तसेच काही वकील यांची साथ होती.
नेरळ येथून वांगणी आणि तेथून कल्याण कर्जत रस्त्याने कर्जत चार फाटा अशी पुढे मुरबाड रस्त्याने कडाव आणि तेथून पुन्हा कर्जत आणि शेवटी हुतात्मा चौक माथेरान नाका अशी 75 किलोमीटर अंतर पार करून स्थगित झाली. उद्या देशाच्या स्वातंत््रय दिनी 100किलोमीटर अंतर ॲड. गजानन डुकरे भारताचा राष्ट्रध्वजासह पार करणार आहेत. यावेळी आ. महेंद्र थोरवे यांच्या शिवतीर्थ या घरासमोर स्वतः आमदार ॲड. डुकरे यांचे स्वागत करणार आहेत.







