वज्र हनुमान घोटवडे चषक 2021 चे आयोजन

। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
वज्र हनुमान क्रिकेट यंघ घोटवडे यांच्यावतीने ओव्हर आर्म क्रिकेटचे भव्य सामने दिनांक 25 व 26 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमाचे उद्घाटन शेकाप जिल्हा महिला आघाडि प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते शनिवार (दि. 25) करण्यात येणार आहे. या अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, शेकाप तालुका चिटणीस अनिल पाटील, माजी सरपंच बेलोशी सदानंद थळे, माजी सरपंच नागाव नंदु मयेकर, पुरोगामी युवक संघटना तालुका अध्यक्ष विक्रांत वार्डे, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. क्रिकेटचे सामने उसर घोटवडे मैदान येथे आयोजित केले आहे.

Exit mobile version