। बीड । प्रतिनिधी ।
बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला अखेर 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
संतोष देशमुख हत्याप्रकरणी वाल्मिक कराडवर मकोकातंर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर वाल्मिक कराडला आज बीड कोर्टात हजर करण्यात आले. बीडच्या मकोका कोर्टात इन कॅमेरावर सुनावणी पार पडली. कोर्टरूममध्ये फक्त न्यायाधीश, आरोपी, आरोपीचे वकील, तपास अधिकारी आणि सरकारी वकील उपस्थित होते. एसआयटी तर्फे तपास अधिकारी अनिल गुजर यांनी आज संपूर्ण तपासाची माहिती देत युक्तिवाद केला. दरम्यान वाल्मिक कराडने हत्येच्या दिवशी संतोष देशमुखांना धमकी दिल्याचा मोठा दावाही एसआयटीकडून करण्यात आला. परिणामी या प्रकरणाचे गांभीर्य लक्ष्यात घेता एसआयटीने 10 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र या मागणीला बीड कोर्टाने मान्यता देत पोलीस कोठडी ऐवजी 7 दिवसांच्या SIT कोठडीला मान्यता दिली आहे.